बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठा निर्णय! रुग्णसंख्या घटल्यानंतर ‘या’ राज्यानं लाॅकडाऊन हटवला

हैद्राबाद | कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होताना दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अशातच तेलंगणा सरकारनं राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोना संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असताना तेलंगणा सरकारनं राज्यातून संपूर्णत: लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय जाहीर केला. लॉकडाऊन दरम्यान जारी करण्यात आलेले सगळे नियम आणि अटी मागे घेत असल्याचं सरकारनं आपल्या आदेशात म्हटलंय.

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्या घट होत आहे. त्याचबरोबर कोरोना नियंत्रणात आहे, असं सरकारनं सांगितलं आहे.

दरम्यान, तेलंगणात शुक्रवारी 1 हजार 417 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळं राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 6 लाख 10 हजार 834 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृतांचा आकडा एकूण 3 हजार 546 वर पोहोचला आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

…..म्हणून लसीकरणासाठी WHO ने भारताकडे मागितली मदत

किंग कोहलीने मोडला महेंद्रसिंह धोनीचा हा खास विक्रम; बड्या खेळाडूंना मागे टाकत मिळवलं अग्रगण्य स्थान

नाशिक दुर्घटनेत मुलाच्या मृत्यूनंतर सरकारने दिलेले 10 लाख रुपये घेऊन सून फरार

“कोणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापौर सुद्धा शिवसेनेचाच होणार”

कौतुकास्पद! वृद्ध महिलेच्या गळणाऱ्या झोपडीसाठी सरसावले पोलिस

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More