बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने राज्यात खळबळ; बीएमसीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | कोरोना (Corona) काळात सर्वांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचे यामध्ये जीव देखील गेले आहेत. तर अनेकांना मोठा आर्थिक फटका देखील बसला. अशातच आता कोरोनाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (New Variants) जगभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे आता राज्य सरकार देखील सतर्क झाल्याचं दिसतंय. (Big decision by Mumbai Municipal Corporation)

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे आता मुंबईकरांची चिंता वाढली आहे. दक्षिण अफ्रिका आणि युरोपाच्या अनेक देशात कोरोना झपाट्याने वाढताना दिसत आहे. आता येत्या ख्रिसमसच्या दिवसात अनेक प्रवासी भारतात येतात. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

खबरदारी म्हणून मुंबई महापालिका जे प्रवाशी अफ्रिकेतून भारतात येणार आहेत. त्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय मुंबई महापालिका करत आहे. मात्र, विमानसेवा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिलं आहे.

दरम्यान, युरोपातून आलेला नागरिक जर कोरोना पाॅझिटिव्ह आढळला तर त्याची जिनोम सिक्वेंसिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्या देशांमधून जिनोम सिक्वेंसिंगच्या अहवालाची देखील मागणी करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी आता प्रशासन अॅक्शन मोडवर आहे.

थोडक्यात बातम्या-

“सरकार पडणार असं बोललं जात आहे, पण चाललंय ना बाबा सरकार”

“…यासाठी सत्ताधारी सेनेला किती दंड आकारायचा?”

“नवाब मलिकांचा त्यांचाच गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का?”

‘… या बाबतीत आम्ही मोदींचे शिष्य’; नवाब मलिकांचा भाजपवर निशाणा

“अजूनही भाजप आणि शिवसेनेचं सरकार स्थापन होऊ शकतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More