बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! एमपीएससी आयोगाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

मुंबई | एमपीएससी आयोगाच्या परिक्षांना उशीर होतोय म्हणून रस्त्यावर उतरणारे विद्यार्थी राज्यानं बघीतलं आहेत. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्व क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. परिणामी रोजगारात घट झाली. देश आणि राज्य व्यवस्थेसमोरील सर्वात मोठी समस्या पदभरती करणं ही आहे. एमपीएससीनं आपला पदभरती कार्यक्रम जाहीर करायला सुरूवात केली आहे.

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा भरतीच्या 2019 परिक्षेत उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोगानं जाहीर केला आहे. पुणे आणि नाशिक या दोन ठिकाणी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखती या 4 ते 14 ऑक्टोंबरदरम्यान पार पडणार आहेत. परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आयोगाच्या या निर्णयाची उतीर्ण झालेले विद्यार्थी गेली 2 वर्ष झालं वाट पहात होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 सप्टेंबरपर्यंत नवीन जागांसाठीचं मागणीपत्र सरकारला पाठवा अशा सूचना केल्या आहेत. राज्यातील नोकरभरती लांबत चालल्यानं सरकारवर विद्यार्थी प्रचंड नाराज आहेत. गेली दोन वर्ष झालं नवीन भरती झाली नाही.

राज्यातील एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोरोना रोगानं आधीच तणावात असणारे विद्यार्थी राज्य सरकाच्या अनास्थेमुळे त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांनी सरकारला आंदेलनाचा इशारा सुद्धा दिला आहे, म्हणून सरकार आता नोकरभरतीवर लक्ष देत आहे.

थोडक्यात बातम्या 

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

“बिग बॉस’चा आवाज पुरुषाचाच असल्यामुळे…’; बेधडक तृप्ती देसाईंचा गौप्यस्फोट

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

”पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी नवज्योतसिंग सिद्धूंची निवड होऊ नये म्हणून मी शेवटपर्यंत लढा देईन”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More