बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारचा करदात्यांना माेठा दिलासा; अनुराग ठाकूर यांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने नको नकोसं केलं आहे. या काळात अनेक उद्योग-धंदे बंद पडले. अनेक लोकांना बेरोजगारीला तोंड द्यावं लागलं. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी काहींकडे पैसे देखील नसल्याचं दिसून येत आहे. अशातच केंद्र सरकारने करदात्यांसाठी एक निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या उपचारासाठी करण्यात आलेला खर्च. तसेच आर्थिक मदतीला प्राप्तीकरातून सवलत देणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी, त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीने इतर व्यक्तीवर कोरोना उपचारासाठी केलेल्या खर्चावर कर आकारण्यात येणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

ही सवलत आर्थिक वर्ष 2019-2020 आणि त्यानंतरच्या काही वर्षांसाठी देण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही करण्यात आली आहे. त्यावरही कोणत्याच प्रकारचा कर आकारण्यात येणार नसल्याचं अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, स्त्रोतवर कर कपातीसाठी देण्यात येणाऱ्या टीडीएस प्रमाणपत्राच्या वितरणासाठी 31 जूलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर, ‘विवाद से विश्वास’  या अंतर्गत वादग्रस्त कर प्रकरणांसाठीही 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली असल्याचं समजंय.

थोडक्यात बातम्या-

“देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर, राजीनामा दिला तरी मी भाजपतच राहणार”

“तुम्ही निवडणुकीचा प्रचार करत होता तेव्हा मी रात्री जागून ऑक्सिजनची व्यवस्था करत होतो”

ठाकरे सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का; निवडणूक पुढे ढकलण्यास आयोगाचा स्पष्ट नकार

‘महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे आरक्षण टिकलं नाही’; दरेकरांचा हल्लाबोल

“मी सीबीआयशी लढतोय अन् तुम्ही माझ्याशी लढण्याची भाषा करता”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More