‘या’ लोकांना कोरोना चाचणी बंधनकारक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | जगातील अनेक देशांमध्ये प्राणघातक कोरोना (Corona) विषाणूची प्रकरणे वाढू लागली आहेत. केंद्र सरकार याबाबत सतर्क झालं असून संपूर्ण काळजी घेत आहे. हे पाहता चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आता आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

या देशांतील कोणत्याही प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास किंवा चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात येईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे.

चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आरोग्य स्थितीची माहिती देण्यासाठी कोविड-19 हवाई सुविधा फॉर्म भरणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय फ्लाइटमधून येणाऱ्या काही प्रवाशांची शनिवारपासून कोरोना विषाणूची चाचणी केली जाईल. शुक्रवारी या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करताना नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितलं की, क्रू मेंबर्सना यासाठी निवडलेल्या प्रवाशांना विमानतळावरील स्क्रीनिंग सुविधेत आणावं लागेल.

चीन आणि इतर अनेक देशांमध्ये कोरोनाव्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, सरकारने प्रत्येक फ्लाइटमधील एकूण प्रवाशांपैकी दोन टक्के प्रवाशांच्या आगमनानंतर विमानतळावर चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला आहे

महत्त्वाच्या बातम्या-