सत्यजित तांबेंच्या बंडखोरीनंतर काँग्रेसचा मोठा निर्णय!
मुंबई | राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होत आहे. यादरम्यान नाशिक मतदारसंघावरून राज्यात बराच राजकीय गोंधळ झाला. सत्यजित तांबेंनी (Satyajit Tambe) केलेल्या बंडखोरीमुळे काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसने याआधी काँग्रेस नेते सुधीर तांबेंचं निलंबन केलं होतं. आता काँग्रेसने सत्यजित तांबेंवर देखील कारवाई केली आहे. सत्यजित तांबेंचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच सत्यजित तांबेंबाबत भाजपने आपली भूमिका जाहीर करावी, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.
मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना नाना पटोलेंनी औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक आणि कोकण महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहेत हे जाहीर केलं. तसेच पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपवर देखील टीका केलीये.
बेरोजगारी आणि नोकरीत काम करणारे लोकं नाराज आहे, नाशिकमध्ये भाजपला साधा उमेदवार मिळाला नाही, स्वतःला मोठा पक्ष म्हणवून घेतो असे म्हणणाऱ्या पक्षाची अशी अवस्था झाल्याचा टोला पटोले यांनी भाजपला लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.