बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसचा मोठा निर्णय; पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर नवज्योतसिंह सिद्धू

चंदीगड | पंजाबमध्ये सुरु असलेल्या अनेक घडामोडींनंतर आता काॅंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी माजी क्रिकेटपटू आणि काॅंग्रेसचे नेते नवज्योत सिंद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचा आक्षेप असूनही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे.

दिल्लीमध्ये रविवारी दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रात्री उशिरा सिद्धू यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. आता नवज्योतसिंह सिद्धू हे सुनील जाखड यांची जागा घेतील. सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार काँग्रेसने पंजाब काँग्रेस समितीवर चार कार्यकारी अध्यक्ष देखील नेमले आहेत. सिद्धू यांच्यासह संगतसिंग, सुखविंदरसिंग, पवन गोएल, कुलजितसिंग यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नवज्योत सिद्धू यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देताना कुलजीतसिंह नागरा यांना सिक्कीम, नागालँण्ड आणि त्रिपुराच्या एआयसीसीच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे.

दरम्यान, पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी होत आहे.

 

थोडक्यात बातम्या –  

“2017 ला मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार होते अन् 2021 मध्ये पाऊस”

“कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत”

मुसळधार पावसात जखमी बाप-लेकीच्या मदतीला धावले पोलीस, पाहा व्हिडीओ

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’; युवक काँग्रेसचं बोंबाबोंब आंदोलन

अमिताभ बच्चन की सोनू सूद?; फोटो पाहून चाहतेही पडले गोंधळात, पाहा फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More