मनोज जरांगेंचा मोठा निर्णय; ‘या’ मतदारसंघांमधून निवडणूक लढणार

Manoj Jarange | मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनी आपण कोणत्या मतदारसंघातून लढणार आहोत हे जाहीर केलं आहे. तसंच जिथे उमेदवार द्यायचा नाही त्या मतदारसंघात उमेदवार पाडला जाणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Manoj Jarange यांची मोठी घोषणा

बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून आपण लढणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. आष्टी, गेवराई मतदारसंघातून लढायचं की नाही यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. तसंच मंठा परतूर मतदारसंघातून उमेदवार देत तेथूनही लढणार आहेत.

जालना जिल्ह्यातून केवळ एकाच मतदारसंघात मनोज जरांगे लढणार आहेत. परतूर -मंठा मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

“आमचे मराठे 100 टक्के एकत्र राहणार”

मी नवीन आहे. त्यामुळे जागांबाबत वेळ लागतोय. एकदोन प्रश्न किचकट आहे. काल मी सर्वांना सांगितलं आहे. माझा समाज एकगठ्ठा राहील. इतरांचं मी काही सांगत नाही. मला काही माहीत नाही. मी त्यांच्या खांद्यावर मान टाकू शकतो. पण आमचे मराठे 100 टक्के एकत्र राहणार आहे, असा दावा त्यांनी केला.

आम्हाला फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बेजार केलं म्हणून लढत आहोत. आम्हाला नाद नाही. आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे. त्यालाच मराठा म्हणतात, असं वक्तव्य त्यांनी केलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘अजित पवार मर्दाची औलाद असते तर…’; जितेंद्र आव्हाड भडकले

‘आमची विचारधारा सेम’; ‘या’ व्हिडीओमुळे पार्थ पवार होतायेत ट्रोल

भाऊबीजेला लाडक्या बहीणींसाठी गिफ्ट शोधताय?, मग ‘इथे’ मिळेल ट्रेंडी ऑप्शन

श्रीनिवास वनगा यांच्यानंतर शिंदे गटाचा आणखी एक नेता नॉट रिचेबल!

देवेंद्र फडणविसांच्या जीवाला धोका?, सुरक्षेत करण्यात आली मोठी वाढ