बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. बैठकीत 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर 1.5 टक्के सूट देण्यास मंजुरी देण्यात आली.

या योजनेअंतर्गत 2022-23 ते 2024-25 या कालावधीत 34 हजार 856 कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं आहे.

अल्पमुदतीच्या कर्जासाठी ही तरतूद राहणार आहे. सरकारच्या या पावलामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळेल. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी यापूर्वीच याबाबत माहिती देताना कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकार भर देत असल्याचं सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

“जर महिलेचे कपडे उत्तेजक असतील तर लैंगिक छळाचा गुन्हा होत नाही”

‘या’ काँग्रेस नेत्याने गुपचूप घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिंदे गटातील आमदार येताच विरोधकांकडून ’50 खोके’च्या घोषणा, देसाई म्हणाले ‘पाहिजे का?’

मोठी बातमी! शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला दणका

CNG गाड्या वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली समोर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More