बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरात कोरोना रूग्णसंख्येला उतरती कळा

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 311 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 456 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 23 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. त्यातील 08 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 563 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,73,039 इतकी आहे. तर पुण्यात 3539 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8437 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,61,063 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 6758 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी कमी व्हायला सुरूवात झाली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“उद्धव ठाकरेंचं मोदींशी जमतं पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही”

‘2024 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा का?’; जयंत पाटील म्हणाले….

लहान मुलांसाठी अनोखं टेस्टींग किट; 15 मिनिटांत होणार कोरोनाचं निदान

“अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढला”

तरुणाकडून माणुसकीचं दर्शन! अशा प्रकारे वाचवले पक्षाचे प्राण, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More