विद्यार्थ्यांच्या परिक्षेसंदर्भात पुणे विद्यापीठाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना येत्या 11 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या परिक्षा रविवारी देखील घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
पुणे विद्यापीठाची परीक्षा ही मार्चमध्ये होणार होती. मात्र एजन्सी निवडण्याची प्रक्रिया चुकल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली. त्यानुसार आता येत्या 15 एप्रिलपासून ही परीक्षा होणार आहे. विद्यापीठाच्या कंपनीतर्फे परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन केले गेलं आहे.
तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेत व्यत्यय आल्यास विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिला जाणार आहे. यापूर्वी सोडवलेली उत्तरे सेव्ह करुन खंड पडल्यास तिथून परीक्षा पुन्हा सुरु होईल. परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी उपलब्ध करुन दिली जाईल. अंदाजे येत्या 7 एप्रिलपासून विदयार्थ्यांना सराव परीक्षा देण्यात येईल.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. यामध्ये 50 मार्कसाठी 60 मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. तसंच निकालही ऑनलाईन पद्धतीनेच लावण्यात येणार आहे.
थोडक्यात बातम्या-
एकाने चूक केली म्हणून संपूर्ण पोलीस दल चुकीचं नसतं- हेमंत नगराळे
“जे आपण कमावलं नाही ते विकून खायचं हा कोणता धर्म?”
सिक्सर किंग फक्त युवराज सिंगच; एका षटकात ठोकले 4 गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ
खळबळजनक! पराभवानंतर बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या
अंबानींच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात आता मनसेची उडी; बड्या मंत्र्यावर धक्कादायक आरोप
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.