बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका; घेतला मोठा निर्णय

मुंबई | राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याच्या विकासाचाही वाटा येतो. जिल्ह्यातील विकास हा त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्याकडे असतो. शिंदे सरकारने अजून पालकमंत्र्याची निवड केली नाही. राज्यातील जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हाधिकारी दरवर्षी जिल्हा नियोजनासंदर्भातील अहवाल तयार करतात. त्यांनतर यावरील अंतिम निर्णय आणि निधी उपलब्ध करून देण्याचं काम जिल्हा नियोजन समिती पालकमंत्र्यांच्या माध्यमातून करून घेते. अजित पवार यांच्या अंतर्गत येणाऱ्या या विभागाने 36 जिल्ह्यांसाठी 13 हजार 340 कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र आता त्याला नव्याने जारी केलेल्या शासन आदेशानुसार तात्पुरती स्थगिती देण्यात आलीय.

शिंदेंच्या सरकारने 2022-23 या आर्थिक जिल्हा विकास प्रकल्पातर्गंत देण्यात येणारा निधी रोखला आहे. जोपर्यंत पालकमंत्र्याची नियुक्ती केली जात नाही तोपर्यत हा निधी दिला जाणार नाही, असं शिंदे सरकारनं निश्चित केल्याची माहिती मिळाली आहे. हा निधी 36 जिल्ह्यासाठी होता. 36 जिल्ह्यासाठी 13 हजार 340 कोटींचा निधी लागणार होता.

मविआमध्ये जिल्हा विकास कामांच्या नियोजन विभाग हा तत्कालीन उपमुख्यंमंत्री अजित पवारांच्याअंतर्गत होता. त्यांच्या काळात 13 हजार 340 कोटींचा निधी पवारांनी मंजूर केला होता. मात्र आता त्याला नव्याने जारी केलेल्या शासन आदेशानुसार तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. सरकार परवानगी देत नाही तोपर्यत 13 हजार 340 कोटींचा निधी मंजूर केला जाणार नाही, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या निर्णयाने जिल्ह्यातील विकास कामे खोळंबण्याची शक्यता आहे.

यामध्ये कोणतंही राजकारण नसतं. जिल्हा विकास समिती आणि जिल्हाधिकाऱ्याचा चर्चेनुसार हा निधी ठरवला जातो. यामध्ये सर्व पक्षांची मतं जाणून घेतली जातात. या निर्णयाबद्दल नव्या सरकारने पुन्हा विचार करावा, असं वक्तव्य मुंबई उपनगरचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या

‘शरद पवारांचं कौतुक नाही करायचं तर कोणाचं करायचं?’; राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला

काळीज पिळवटून टाकणारी घटना; 6 वर्षाच्या चिमुकल्याने आईच्या डोळ्यादेखत जीव सोडला

शिवसेनेला आणखी एक झटका; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

मुंबईकरांसाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

धक्कादायक! हॉटेलमध्ये पोळी लाटताना कर्मचाऱ्याने केलं ‘हे’ कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More