बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय!

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढतच चालला आहे, हे लक्षात घेत दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. मात्र तरी सुद्धा बोर्डाने दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकात कोणताही दिव्यांग, अपंग विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं परिपत्रक काढून राज्यातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखनिक आणि वाचनिकाची सोय करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे तर दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार असल्याचं राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे. राज्यातील एकही दिव्यांग विद्यार्थी हा परीक्षेपासून वंचित राहणार नाही. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले यांनी या संदर्भातील आदेश काढून राज्यातील शाळांना सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीसाठी हे पत्र काढण्यात आलं आहे.

देशात सगळीकडेच सर्व शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करता आला नाही. त्याचबरोबर,वर्ग न झाल्यामुळे शिक्षकांना पूर्ण अभ्यासक्रमही शिकवता आला नाही. हा विचार करुन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जुलै महिन्यात इयत्ता 10 आणि 12 वीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला होता.

थोडक्यात बातम्या

“मृत्यूनंतर माझ्या अस्थी बिअरमधून पबबाहेरील नाल्यात विसर्जित करा”

संजय राठोड प्रकरणी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार?; संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधाण

गळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करुन नंतर दगडाने ठेचलं; पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याच्या हत्येने खळबळ

“नटाचा मृत्यू झाल्यावर खळबळ माजते पण सात वेळा खासदार झालेला माणूस जातो तेव्हा सगळे शांत”

लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी कायपण… ‘या’ भागात सुरु आहे अत्यंत धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More