बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनाथ मुलांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मुंबई | सध्या देशात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात अनाथ मुलांच्या आरक्षण मुद्दा देखील मागील 2 वर्षापासून चर्चेचा विषय आहे. भाजप सरकार सत्तेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथ मुलांना 1 टक्के आरक्षण दिलं होतं. पंरतु महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ठाकरे सरकारने फडणवीस सरकारचे निर्णय रद्द केले होते. त्यानंतर आता अनाथ मुलांच्या आरक्षण मागणीवरून अनाथांना 1 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

अनाथ मुलांना नोकरीत आणि शिक्षणात 1 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत अनाथ मुलांच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता यशोमती ठाकूर यांनी घोषणा केली आहे. अनुसूचित जातीप्रमाणे वय, परिक्षा शुल्क, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्कमध्ये सुट देण्याचा निर्णय घेतला असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे.

अनाथ मुलांच्या व्याख्येत देखील बदल करण्यात आला आहे. अ, ब, क अशी तीन वर्गवारी करण्यात आली आहे. त्यातील अ आणि ब प्रवर्गातील मुलांना परिक्षा शुल्क, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्कमध्ये सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या मुलांच्या नातलगाच्या आणि पालकांचा काहीही पुरावा नाही, अशा मुलांचा समावेश अ गटात करण्यात आला आहे.

दरम्यान, क प्रवर्गातील मुलांना नोकरीत आरक्षण लागू केलं जाणार नाही. त्यांना परीक्षा शुल्क, शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्कमध्ये सवलत दिली गेली आहे. त्यातच बरोबर अनाथ मुलांच्या प्रमाणपत्र प्रक्रियेत सुलबता लागू करण्याचा करण्यात येणार असल्याचं देखील यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

भाजपच्या पोटात मराठा आरक्षणाविषयी आकस- सुप्रिया सुळेेेंचा भाजपवर निशाणा

दिलासादायक! येत्या चार ते पाच दिवसात होणार पावसाचं दमदार आगमन, हवामान खात्याचा अंदाज

एक, दोन नाही तर तब्बल तीन शतके ठोकूनही ‘या’ स्फोटक खेळाडूला संघात स्थान नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More