बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य सरकारचा मोठा निर्णय! खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारला खासगी शाळांच्या फी संदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते. कोरोनाकाळात केलेली फी वाढ रद्द करावी तसेच राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. न्यायालयाच्या याच निर्देशांचं पालन करत आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

खासगी शाळांचे 15 टक्के शुल्क माफीबद्दलचे अध्यादेश राज्य सरकारकडून लवकरच काढण्यात येतील. खासगी शाळांनी किती फी आकारावी हे ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. मात्र, कोरोनामुळे फी कपातीचा अधिकार राज्य सरकारकडे घेण्याचे या अध्यादेशामध्ये प्रस्तावित आहे.

कोरोना महामारीमुळे अगोदरच सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. यामध्ये शाळांच्या भरमसाठ फी हा पालकांपुढे मोठा प्रश्न होता. मात्र, आता राज्य सरकारचा हा निर्णय पालकांना दिलासा देणारा ठरणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील काही पालकांनी कोरोनाकाळात झालेल्या फी वाढीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सुनावणी करताना 22 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फी संदर्भात महत्वाचे निर्देश दिले होते. तसेच येत्या तीन आठवड्यांमध्ये यावर निर्णय घेत आदेश द्यावेत, असं देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या –

‘धीर तरी कसा देऊ’; चिपळूणच्या पाहणी दौऱ्यावर असताना उर्मिला मातोंडकरांना पैसे देताना अश्रू अनावर

“शरद पवारांना बाहेरचे सोडा घरचे लोक देखील गांभीर्योने घेत नसावेत”

बाबो! प्रशिक्षकाने मॅच अगोदर महिला खेळाडूच्या लावली कानशिलात; टोकियो ऑलिम्पिकमधील व्हिडीओ व्हायरल

“भाजपवाले मत मागायला येतील दोन पायांवर पण जातील चौघांच्या खांद्यावर”

राज कुंद्राने लॅाकडाऊनमध्ये फक्त पाचच महिन्यात कमावले ‘एवढे’ कोटी रुपये!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More