बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातल्या प्रत्येकाला मिळणार मोफत लस

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. ठाकरे सरकारनं लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सर्व नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचं कळतंय.

राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत 45 च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. हा देशात विक्रम आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच 18 ते 44 च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

प्रियांका चोप्राची बहिण आली भांडणावर, प्रियांकावर केले अत्यंत धक्कादायक आरोप

तलफ तलफ तलफ… गुटखा, तंबाखूची पुडी, देशी दारु महागली!

पुण्यात महिलेचा मृतदेह आढळला, अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्यानं खळबळ

आज 4 वाजल्यानंतर हे काम कराच, अन्यथा मिळणार नाही कोरोनावरील लस!

विराट कोहलीला मोठा दिलासा, रोहित शर्मानं उधारीवर दिला आपला ‘हा’ खेळाडू!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More