बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! निर्बंधांमधून शिथिलता देण्यासाठी दिले ‘हे’ निर्देश

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या जवळपास दीड वर्षांपासूनही अधिक काळ राज्यात विविध निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यातच आता कोरोना आटोक्यात आला असताना नागरिकांना निर्बंधांमधून शिथिलता देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. या बैठकीत निर्बंधांमधून शिथीलता देण्यासाठी चर्चा करण्यात आली. तसेच येत्या काही दिवसात कोरोना रुग्णांचा आकडा घटत असल्याने दुकानं व रेस्टाॅरंटच्या वेळा वाढवून देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

लहान मुलांच्या अम्युझमेंट पार्क सुरू करण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यातून पाण्यातील राईड्स वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाण्यातील राईड्सबाबत नंतर निर्णय घेतला जाणार आहे, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

येत्या 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहांबरोबरच आता अम्युझमेंट पार्कही सुरू कऱण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दुकानांच्या आणि उपहारगृहांच्या वेळा वाढवण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना तयार कराव्या, असे निर्देश देण्यात मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

थोडक्यात बातम्या

अबब! 2 वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या ‘या’ कर्णधाराने नाकारली भारतीय प्रशिक्षकपदाची ऑफर

आजची शिवसेना पूर्णपणे उपऱ्यांची; प्रविण दरेकरांचं संजय राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर

नगरमधील एका बड्या मंत्र्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार- राधाकृष्ण विखे पाटील

“मोदी सरकारला अर्थकारण-प्रशासन कळत नाही फक्त उद्योगपती मित्रांचं हित समजतं”

वाढत्या इंधन दराबाबत चिंता व्यक्त करत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं कारण, म्हणाल्या….

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More