बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठा निर्णय! एसईबीसी प्रवर्गातील जागा आता खुल्या प्रवर्गातून भरणार

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं समोर आलं होतं. मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी पोलिस भरतीच्या तसेच अन्य परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता सामान्य प्रशासन विभागाने मराठा समाजासाठी आणि पद भरतीसाठी एक मध्यस्त मार्ग काढला आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार आहे. एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना EWS प्रवर्गातून ऐच्छिक स्वरूपाचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. राज्यातील 2,226 पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला होता.

एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना EWS प्रमाणपत्र आधीच देणं बंधनकारक राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाची मंजुरी देण्यात आली आहे, त्यामुळे तब्बल 13 हजार जागांसाठी भरती होणार आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयातील निर्णयामुळे भरती रखडली होती. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील एकूण 118 आरोग्य संस्थांकरीता 812 नियमित पदे निर्माण करण्यास तसेच 1184 कुशल मनुष्यबळ सेवा आणि 226 अकुशल मनुष्यबळ सेवा अशी एकूण 2,226 पदे भरुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीनं आदेश जारी करणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

विजय वडेट्टीवार मुख्यमंत्र्यांवर नाराज? भर पत्रकार परिषदेत व्यक्त केली नाराजी

“जनता भाजपला कंटाळली असून आता काँग्रेस हाच भाजपला एकमेव पर्याय”

महाराष्ट्रातील कोणत्या महापालिका सध्या अनलॉकच्या कोणत्या स्तरामध्ये आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोसह निकृष्ट फीड देणाऱ्या कंपनीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More