नवी दिल्ली | आजच्या काळात स्मार्टफोन आपली गरज झाली आहे. जास्तीत जास्त सुविधा देणारे स्मार्टफोन युजर्सना आकर्षित करतात. त्यामुळे अनेकांचा कल iphone घेण्याकडे असतो. तुम्ही देखील iphone घेण्याच्या विचारात असाल तर iphoneच्या लेटेस्ट मॉडेलवर घसघशीत सूट मिळत आहे.
iphone प्रेमींचं iphone घेण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण Apple त्यांच्या iphone 13 मॉडेलवर बंपर ऑफर देत आहे. 128GBच्या iphone 13ची किंमत सध्या 79,900 रूपये आहे. मात्र istore मधे iPhone 13 फक्त 50,900 रूपयांत मिळत आहे.
इंडिया istoreने iphone 13वर 5 हजारांचा स्टोअर डिस्काउंट आणि 6 हजार रूपयांच्या कॅशबॅकची बंपर ऑफर दिली आहे. ICICI क्रेडिट आणि डेबिट कार्ड, कोटक डेबिट आणि क्रेडिट कार्ड व SBIच्या क्रेडिट कार्डवर कॅशबॅक ऑफर मिळणार आहे.
दरम्यान, स्टोअर डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफरसह iphone XR, iphone 11, iphone 12 या जून्या iphoneवर 18 हजारांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे एक्सचेंज ऑफर फोनच्या कंडिशनवर अवलंबून असणार आहे.
थोडक्यात बातम्या-
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फटका, होतील ‘हे’ गंभीर परिणाम
मोठी बातमी! पुतीनची युक्रेनवर सैन्य कारवाईची घोषणा
‘यापुढे आणखी घोटाळे बाहेर काढू’, वडिलांच्या अटकेनंतर सना मलिकचा आक्रमक पवित्रा
मोदी सरकारची अफलातून योजना, एकाच वेळी मिळणार 10 लाख
“आता जीव गेला तरी चालेल पण भाजपला सोडणार नाही”
Comments are closed.