बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा ताजे दर

मुंबई | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कल असतो. त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं.

भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो. मात्र, गेले दोन दिवस सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसात प्रती तोळा सोन्याच्या दरात तब्बल 250 रुपयांची घट झाली आहे. 250 रुपयांंच्या घटीसह सध्या मुंबईतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 30 रुपये प्रती तोळा आहे.

सोन्याच्या दरात जरी घट झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र आज वाढ झाली आहे. आज प्रती किलो चांदीमागे तब्बल 350 रुपयांची वाढ झाली आहे. 350 रुपयांच्या वाढीसह सध्या मुंबईतील सराफा बाजारात चांदीचा दर 60 हजार 450 रुपये प्रती किलो आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

‘बांधावर जायच्या आधी जयंत पाटील चंद्रावर…’; गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

“गोवा ड्रग्ज माफियांच्या ताब्यात अडकला आहे, तिकडे जाणं गरजेचं”

“शेतकरी उद्धवस्त, उभी पीकं पाण्याखाली, औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा”

धक्कादायक! ठाण्यातील नर्सने कोरोनाऐवजी दिली रेबिजची लस अन् मग…

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्रातील ‘या’ 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More