बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण; पाहा आजचा दर?

मुंबई | कमोडिटी बाजारामध्ये सोने आणि चांदीचा दरामध्ये मोठी घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत असतानाच भारतामध्ये त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

सोन्याचा भाव तब्बल 750 रुपयांनी कमी झाला असून चांदी 1100 रुपयांनी स्वस्त झाली आहे. दरम्यान, फेडरल रिझर्वच्या बैठकीकडे गुंतवणुकदार लक्ष ठेवून बसले असतानाच फेडरल रिझर्व्हने व्याजाचे दर वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी रोखीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण होत आहे.

सध्या सोन्याचा भाव 48 हजार रुपये प्रति तोळा एवढा झाला आहे. तर चांदी ही 70,350 रुपये प्रति किलो पर्यंत खाली आली आहे. गेल्या महिनाभरातील सोन्याचा दर आज सर्वात कमी असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सोने खरेदीला सध्या चांगली संधी असल्याचं पाहायला मिळत आहे.

मागच्या वर्षी सोन्याने सर्वोच्च किंमतीचा विक्रम नोंदवला होता. त्यानंतर आता सोन्याच्या किंमती हळुहळु कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी तसेच लग्नासाठी सोनी खरेदीची उत्तम संधी पुढच्या काही दिवसांत आहे, असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या –

कोणता निर्णय कधी घ्यायचा हे या सरकारला कळत नाही- गोपीचंद पडळकर

…तर महाराष्ट्रात चमत्कार होईल- संजय राऊत

मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक

“मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा नाही झाली तर काय होईल हे सांगायची गरज नाही”

भाजपला धक्का; माजी मंत्री काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More