बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

IRCTCच्या स्टॉकमध्ये एवढी मोठी घसरण का? एक्सपर्ट म्हणतात…

मुंबई | दररोज शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडत असतात. विविध कंपन्यांच्या बाजार मुल्यात वाढ आणि घट होत असते. कधीकधी बाजारात तेजी असते तर कधी मंदी असते याचा सर्वाधिक नफा आणि तोटा गुंतवणूकदाराला होतो. अशातच आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सध्या पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. पण दोन दिवसांपासून शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरण आहेत. याचा थेट फटका गुंतवणूकदाराला होताना दिसत आहे. बुधवारी ट्रेडिंगवेळी आयआरसीटीसीचे शेअर तब्बल 15 टक्के खाली आले आहेत. मंगळवारी ट्रेडिंगदरम्यान शेअर्स आपल्या ऑल टाईम हाय व्हाॅल्यूवर गेले होते. 6393 पर्यंत मजल मारली होती पण अचानक बुधवारी शेअर्स कोसळले.

आयआरसीटीसीमध्ये सातत्यानं दोन दिवस घसरण पाहायला मिळाली आहे. जास्त घसरण होण्याची शक्यता नाही कारण आयआरसीटीसीचा जास्त हिस्सा भारत सरकारकडे आहे. आयआरसीटीसीचे शेअर्स घेण्यापासून गुंतवणूकदारांनी थांबलं पाहिजे, असं चाॅईस ब्रोकिंगचे समीत बागडिया म्हणाले आहेत. 1 सप्टेंबर रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 2730 होती तर सप्टेंबर अखेर हा शेअर 4000 हजार रूपयांच्या जवळ पोहचला होता.

दरम्यान, आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये घसरण गेल्या दोन दिवसांपासून पाहायला मिळत असल्यानं तज्ज्ञांच्या मते गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे. आयआरसीटीसी भारतीय रेल्वे विभागाशी संलग्न कंपनी आहे.

थोडक्यात बातम्या 

पीककर्ज घेताय का? असे असतील बँकांचे नवीन निकष; जाणून घ्या सविस्तर माहिती

गरिबांना लुटणाऱ्यांना सरकार सोडणार नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी

काय सांगता! मृत्यूच्या 70 वर्षांनंतर देखील आजही अनेकांना जीवनदान देतेय महिला

भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर काय होणार? वाचा काय सांगतो ICCचा नियम

उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीने हाहाकार! तब्बल 46 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More