बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सेनसेक्समध्ये मोठी घट! गुंतवणूकदारांना तब्बल ‘इतक्या’ कोटींचा फटका

मुंबई | गेल्या काही दिवसांपासूून शेअर बाजारात सोन्याचे दिवस आले आहेत. कोरोना काळात सेन्सेक्स 30 हजारापर्यंत खाली आला होता. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने जानेवारीपासून पुन्हा शेअर बाजाराने उसळी घेतली होती आणि त्यानंतर आता सेनसेक्समध्ये चढ उतार होत असल्याचं दिसून येतंय.

गुरूवारी शेअर बाजारातील मागील 6 महिन्यांमधील ही सर्वात मोठी घसरण झाल्यामुळे गुंतवणुकदार सध्या चिंतेत सापडले आहेत. त्यानंतर आज देखील सेनसेक्स आणि निफ्टीमध्ये घट झाल्याचं दिसून आलं आहे. आज बाजार बंद होताना सेनसेक्समध्ये तब्बल 677 अंकाची घट झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.82 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

सेनसेक्समध्ये 677 अंकाची घसरण होऊन सेनसेक्स 59,306 अंकावर बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टीमध्ये देखील 185 अंकाची घट होऊन निफ्टी 17,671 अंकावर बंद झाला आहे. अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 189 अंकांची वाढ झाल्याचं पहायला मिळालं. तर, डाॅ रेडीज लाॅबमध्ये 89 अंकाची वाढ झाली. त्याचबरोबर श्री सिमेंटमध्ये 1.57 टक्क्याची वाढ होऊन 442 अंकांनी वाढ झाल्याचं पहायला मिळालं.

एकीकडे सिमेंट कंपन्यांमध्ये वाढ होत असताना दुसरीकडे आयटी कंपन्यामध्ये घट होत असल्याचं दिसून येतंय. टेक महेंद्रामध्ये 3.62 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे त्याचा सर्वात जास्त फटका आयटी क्षेत्राला बसलेला दिसतोय. टाटा पाॅवर, रिलायन्स, अॅक्सिस बँक यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये घट झाल्याने गेल्या काही दिवसांपासून गुंतवणूकदारांना मोठा फटका बसल्याचं दिसत आहे. तर नैसर्गिक वायू क्षेत्राला देखील या आठवड्यात मोठी घट झाल्याचं दिसतंय.

दरम्यान, हेवीवेट फायनान्स आणि आयटी क्षेत्रातील मोठ्या घडामोडींमुळे देशांतर्गत इक्टिटीची विक्री झाली. त्यामुळे त्यांचा परिणाम मुंबई बाजारात दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून बाजारात घट दिसून येत असली तरी आगामी सणासुदीच्या काळात बाजारात वाढ होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे अखेर कोरोनामुक्त

‘MPSCच्या ‘त्या’ उमेदवारांना आणखी दोन संधी द्या’; संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अन् न्यायालयाने दिले थेट जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश

ठाकरे सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांना दिवाळी गिफ्ट; शिष्यवृत्तीसाठी ‘इतके’ कोटी मंजूर

“चंद्रकांत पाटील हल्ली झोपेतही बोलतात, असं कानावर आलंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More