मद्यप्रेमींसाठी मोठी गुड न्यूज; ‘या’ 6 राज्यांमध्ये मिळणार घरपोच दारू

Liquor Home Delivery | घरात किराणा संपला आहे पण दुकानात जायला कंटाळा आहे तर बिग बास्केटवरून घर बसल्या किराणा माल आपल्या दारावर हाजीर होतं. स्वीगी, झोमॅटो, बिग बास्केट अशा अनेक ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सने माणसाचं जीवन सोप्प करून ठेवलं आहे. पण तसं तळीरामांसाठी नव्हतं, कि मोबाईल फोन फिरवला आणि घर बसल्या हातात दारू मिळेल. पण आता त्यांनाही घरबसल्या दारू मिळणार (Liquor Home Delivery) आहे. मद्यप्रेमींसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.

मद्यप्रेमींसाठी मोठी गुड न्यूज

दारु उद्योगाला चालना देण्यासाठी दारुची होम डिलिव्हरी करण्यात येणार आहे. झोमॅटो (Zomato), स्विगी (Swiggy) आणि बिग बास्केट या प्लॅटफॉर्मनेही यासाठीची तयारी सुरु केली आहे.

दिल्लीतील लोकांना लवकरच दारूची होम डिलिव्हरी (Liquor Home Delivery) मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत झोमॅटो, स्विगी आणि बिग बास्केट या प्लॅटफॉर्मने यासाठीची तयारी केली आहे. मात्र, ही व्यवस्था लवकरच संपूर्ण देशातील दारु उद्योगासाठी गेम चेंजर ठरणार आहे.

Liquor Home Delivery | 6 राज्यांमध्ये मिळणार घरपोच दारू

दिल्ली व्यतिरिक्त कर्नाटक, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, गोवा आणि केरळ या राज्यांनीही यावर पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची योजना आखली आहे. कोविडच्या काळात, अशी कल्पना प्रथम केरळ आणि कर्नाटकमध्ये मांडण्यात आली होती. परंतू त्यानंतर ती अंमलात आणता आली नाही.

2020 मध्ये Swiggy आणि Zomato ने COVID-19 लॉकडाऊन दरम्यान त्यांच्या ऑफरमध्ये विविधता आणण्यासाठी बिगर-महानगरीय भागात ऑनलाइन अल्कोहोल डिलिव्हरी सुरू केली, ज्याचा त्यांच्या मुख्य व्यवसायांवर गंभीर परिणाम झाला. झारखंड सरकारकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर स्विगीने रांचीमध्ये अल्कोहोल वितरण सेवा सुरू केली. त्यानंतर झोमॅटोने रांचीमध्ये लॉन्च केले आणि झारखंडमधील इतर सात शहरांमध्ये विस्तार करण्याची तयारी केली.

सध्या फक्त ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दारूची होम डिलिव्हरी अधिकृत आहे. महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड आणि आसाममध्ये कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान मद्य वितरणाचा तात्पुरता परवाना काही निर्बंध असूनही यशस्वी झाला.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुणे हादरलं! सासवडमध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ

अभिनेत्री जान्हवी कपूरला झाली विषबाधा?, रुग्णालयात उपचार सुरू

“अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का?”; योजनेसाठी काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा नकार

उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात! 10 ते 12 डब्बे रुळावरून घसरले, मृतांचा आकडा समोर

महिलांनो ‘या’ दोन गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; अन्यथा होऊ शकतो Breast Cancer