बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘युपी निवडणुकीआधी बड्या हिंदू नेत्याची….’; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली | कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचं अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत अनेकवेळा चर्चा देखील केली. मात्र, या सर्व चर्चा विफल गेल्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. त्यातच आता राकेश टिकैत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

सीसरामध्ये बोलत असताना राकेश टिकैत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्याचसोबत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका देखील केली आहे. भाजपपेक्षा घातक कोणताही पक्ष नाही, यांच्यापासून सावध रहा. हे निवडणुकीआधी एका बड्या हिंदू नेत्याची हत्या घडवून आणू शकतात, असं वक्तव्य राकेश टिकैत यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. ज्या लोकांनी भाजपची निर्मिती केली त्यांनाच भाजपच्या नेत्यांनी घरात कैद करून ठेवलं आहे, असंही टिकैत म्हणाले. ज्यांनी पोलिसांवर लाठीचार्ज केला त्यांचे चुलते आरएसएसमध्ये मोठ्या पदावर आहेत आणि हे लोक आम्हाला खालिस्तानी म्हणतात, अशा हल्लाबोल देखील टिकैत यांनी केलाय.

दरम्यान, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, असं केंद्र सरकारने सांगितलं होतं मात्र, त्यातलं काहीच झालं नाही, असं म्हणत त्यांनी केंद्रावरही निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

माझ्या तोंडी वक्तव्य घालून समाजात द्वेष पसरवला जातोय – अण्णा हजारे

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

‘उद्धव- राज -नारायण राणे एकत्र आले असते तर…’; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी आमंत्रण; 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटण्याची शक्यता

सह्याद्रीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक; शरद पवारांनी दिले ‘हे’ आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More