बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

पुणे | कोरोनाने पुन्हा डोक वर काढत आहे. लस आल्यावर नागरिकांना कोरोनाची पहिल्यासारखी भीती राहिली नाही. त्यामुळे बेजबाबदारपणे नागरिक विना मास्कचे आणि प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचं पालन केलं नाही. मात्र या बेफिरीमुळे पुन्हा कोरोना आता मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी वाढत चालली आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 753 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 700 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 7 जणांना आपल्या प्राणास मुकावं लागलं आहे. तर मृतांमधील 1 रूग्ण हे पुण्याबाहेरील होता.

पुण्यात सध्या 358 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,09,083 इतकी आहे. तर पुण्यात 6735 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4897 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,97,451 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 6534 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनमध्ये आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशा प्रकारचं अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय घोषित केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातही अंश:त लाॅकडाऊन; जाणून घ्या!

‘हे महाराष्ट्राच बजेट की मुंबई महापालिकेचं’; अर्थसंकल्पावरून देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र

अखेर अमृता फडणवीसांच नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा व्हिडीओ

कारखान्यात 500 लोकं चालतात, लग्नात 100 लोकंही नाही; कोरोनाशी अधिकाऱ्यांची सेटिंग?

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पातील ‘या’ महत्वाच्या दहा घोषणा, जाणून घ्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More