बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वानखेडेंनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या’; आणखी एका साक्षीदाराचा धक्कादायक खुलासा

मुंबई | देशभरात सध्या मुंबईतील कथित कार्डेलिया ड्रग्स प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. दिवसेंदिवस या प्रकरणाला नवीन वळण येताना दिसत आहे. एनसीबी तपास अधिकारी समीर वानखेडे हे सध्या या सर्व प्रकरणाच्या केंद्रस्थानी आलेले दिसत आहेत. त्यांच्यावर दिवसेंदिवस गंभीर आरोप होत आहेत. प्रभाकर साईलनंतर आता आणखी एका नव्या साक्षीदाराने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

खारघर येथील एका जून्या प्रकरणातील साक्षीदार आता समोर आला आहे. शेखर कांबळे याने एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. खारघर येथील एका नायजेरियन ड्रग्स पेडलर प्रकरणामध्ये मला साक्षीदार करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या, असा आरोप पंच शेखर कांबळे याने समीर वानखेडेंवर केला आहे.

समीर वानखेडेंनी त्यावेळी मला पंचनामा वाचायला दिला नाही. तेव्हा जी कारवाई केली होती, ती पूर्णपणे खोटी होती. त्यात काहीच सापडलं नाही. मात्र, 60 ग्राम एमडी सापडल्याचं दाखवण्यात आलं होतं. मी आणि माझा मित्र प्रचंड दहशतीत आहोत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या केसमध्ये या सर्व पेपरचा उल्लेख होता. ज्यामध्ये 60 ग्रॅम एमडी पकडल्याचं समजल्यामुळे मी घाबरलो, असं शेखर कांबळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मला अनिल मानेंचा फोन आल्यामुळे मी तिथे गेलो नाही. मी पंचनामा वाचला नसल्यामुळे मला न्यायाधिशांनी प्रश्न विचारल्यावर काय उत्तर देऊ, याची भीती वाटत आहे. समीर वानखेडे मला 19 तारखेपर्यंत मला फोन करायचे. मी त्यांना नायजेरियन लोकांची माहिती द्यायचो. पण मला त्यांनी अंधारात ठेवलं आहे. मी सर्व चौकश्यांसाठी तयार असल्याचं शेखर कांबळेने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या –

समीर वानखेडे यांचा निकाह लावून देणारे मौलाना आले समोर; केले ‘हे’ धक्कादायक खुलासे

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला अखेर ठाकरे सरकारचा हिरवा कंदील

पंजाबमध्ये राजकीय खळबळ; अमरिंदरसिंग यांनी केली महत्त्वाची घोषणा

भाजपला मोठा धक्का! भाजपचे 22 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर

यंदाच्या दिवाळीत अमृता फडणवीस चाहत्यांना देणार सुरेल दिवाळी गिफ्ट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More