Top News देश महाराष्ट्र

गृहिणींचं बजेट कोलमडलं… सिलेंडरच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

Photo Courtesy- Youtube/IOCL

मुंबई | घरगुती सिलेंडरच्या किंमतीत जर वाढ झाली की, गृहिणींच्या बजेटला मोठा फटका बसतो. सरकार घरगुती सिलेंडरला अनुदान देत असतं. त्यामुळे घरगुती सिलेंडर सर्वसामान्यांना स्वस्त दरात उपलब्ध होतो. सरासरी अनुदान एकूण किंमतीच्या 30 ते 40% ठेवलं जातं. पण आता केंद्र सरकार अनुदानाची किंमत कमी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरवरील मिळणाऱ्या अनुदानात 270 वरून थेट 40 रूपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिलेंडरच्या किंमतीत 75 ते 90 रुपयांची वाढ होणार आहे. मागील काही काळात सरकारने अनुदानात घट करण्यास सुरवात केली होती. डिसेंबर 2020 मध्ये दोन वेळा सरकारने 50-50 रुपयांची वाढ केली होती.

तर 1 फेब्रुवारीला एलपीजी दरात 190 रुपयांची वाढ झाली होती. आता सध्या मुंबईत 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 769 रुपये झाली आहे. केंद्र सरकारला महसुली खात्याचा ताण कमी करायचा असल्याने अनुदानात घट करण्यास सुुरूवात केली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला निश्चित कात्री बसेल.

याच दरम्यान पेट्रोल आणि डिजेलच्या किंमतीत वाढ झाल्याने केंद्र सरकारवर टिका केली जात आहे. काही ठिकाणी पेट्रोलने शंंभरी गाठली आहे. आता त्यात आणखी भर म्हणुन घरगुती सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने केंद्र सरकारला चौफेर टिकेचा सामना करावा लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

रेल्वेत आढळली बेवारस बॅग, खोलून पाहताच अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे!

धक्कादायक! तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसाला मारहाण करत गणवेशही फाडला

15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर आलेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक!

हजारो कोटी चुकून ट्रान्सफर; ‘या’ बँकेच्या चुकीनं भल्याभल्यांची झोप उडाली!

भाजपचं 24 फेब्रुवारीला राज्यात 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन- चंद्रशेखर बावनकुळे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या