Dawood | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई | भारताचा मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमबाबत (Dawood Ibrahim) एक मोठी बातमी समोर आली आहे. दाऊदला विषबाधा झाल्याची बातमी आहे. पाकिस्तानी पत्रकारांनी हा मोठा दावा केला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर (Dawood Ibrahim) कराचीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये बोललं जात आहे. मात्र या वृत्ताला अद्याप कोणीही दुजोरा दिलेला नाही. तसेच विष देण्याचा प्रयत्न कोणी केला याची माहिती नाही.

Dawood Ibrahim ला मारण्याचा प्रयत्न?

दाऊद इब्राहिमला (Dawood) कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला विष  दिल्याचा दावा केला जात आहे. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पाकिस्तानच्या जिओ टीव्ही न्यूजनेही सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांचा हवाला देत म्हटलं आहे की, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत.

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि डी-कंपनीचा प्रमुख दाऊद इब्राहिम हा भारतातून फरार आहे. दाऊद इब्राहिम हा 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड होता. स्फोट घडवून आणल्यानंतर तो भारत सोडून दुबईला पळून गेला.

दाऊदने पाकिस्तानात आपले तळ बनवलं. तो तेथे आपल्या कुटुंबासह राहतो. त्याच्यावर भारतात दहशतवादी हल्ला, खून, अपहरण, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, संघटित गुन्हेगारी, ड्रग्ज, शस्त्रास्त्रांची तस्करी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2003 मध्ये त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलं होतं.

दाऊद इब्राहिम कासकरचा जन्म डिसेंबर 1955 मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता. त्याचे वडील इब्राहिम कासकर हे पोलीस हवालदार होते. नंतर दाऊद इब्राहिमचे कुटुंब मुंबईतील डोंगरी भागात स्थायिक झाले.

70 च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचं नाव वेगाने वाढू लागलं. पूर्वी तो हाजी मस्तान गँगमध्ये काम करायचा. तिथे राहत असताना त्याचा प्रभाव वाढू लागला. लोक त्याच्या टोळीला डी-कंपनी म्हणू लागले आणि तो त्याचा नेता मानला जाऊ लागला.

महत्त्वाच्या बातम्या- 

Tripti Dimriचं अनुष्काच्या भावासोबत ब्रेकअप, ‘या’ बलाढ्य व्यक्तीसोबत सुरु झालंय अफेअर?

Pune News | पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात आग लागल्याने मोठी खळबळ

Aishwarya Rai | ती आता लहान राहिलेली नाही!, अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट कुणासाठी???

Entertainment News: मुलगा झाला की मुलगी???, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गोड बातमी

INDvsSA | भारताच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ थांबेना! शमी-चहरनंतर आता ‘हा’ बडा खेळाडू मालिकेतून बाहेर