बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिद्धार्थला रुग्णालयात आणलं तेव्हा काय झालं?, हॅास्पिटलकडून मोठी माहिती

मुंबई | अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या 40 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला आहे. शुक्लाचे ह्रदयविकाराने निधन झालं आहे. त्यामुळे त्याचे सहकलाकार, चाहते तसेच मनोरंजन क्षेत्रातील लोकांना जबरदस्त धक्का बसला आहे. बुधवारी शुक्लाला कपूर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अशातच रूग्णालयाने दिलेल्या अहवालात सिद्धर्थच्या मृत्यूबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे.

बुधवारी मध्यरात्री सिद्धार्थने झोपेची गोळी खालली होती. त्यानंतर तो त्या रात्री झोपी गेला. गुरूवारी सकाळी सिद्धार्थच्या छातीत दुखू लागल्याने त्याला कपूर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की सिद्धार्थला ह्रदय विकाराचा झटका आला होता.

प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अगदी कमी वयात शुक्लाचं निधन झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच साधारण सकाळी 09.25 वाजता त्याचा मृत्यू झाला होता. तसेच रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची बाह्य जखम आढळून आलेली नाही आहे, अशी महत्वाची माहिती रूग्णालयाने दिली आहे.

दरम्यान, सिद्धार्थने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात काम केलं आहे. शुक्लाने अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. परंतु बिग बॉस 13 व्या शोचा विजेता ठरल्यानंतर शुक्ला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकांच्या पसंतीस उतरला होता.

थोडक्यात बातम्या-

व्हॅाट्सॲपवरुन ओळख, मैत्री, प्रेम अन्… अक्षय बोराडेविरोधात पत्नीनं दाखल केला गुन्हा

शहनाजवर आभाळ कोसळलं, वडिलांनी दिली मुलीच्या प्रकृत्तीबद्दल मोठी माहिती

‘मोदींच्या जीवावर विजयी व्हायचं अन्…’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; पाहा व्हि़डीओ

‘मंदिरं खुली करा नाहीतर…’; मनसेचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम!

व्हाट्सअॅपचा मोठा दणका! भारतातील ‘तशा’ वापरकर्त्यांची खाती केली बंद

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More