Pune News | पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. बांदल यांच्या निवासस्थानी मंगळवारी ईडीने अचानक धाड टाकली. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मंगलदास बांगल यांच्या शिक्रापूर आणि पुण्यातील हडपसर भागातील महंमदवाडी परिसरात असलेल्या निवासस्थानी ईडीने सकाळी 7 वाजताच कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत त्यांच्या घरात 5 कोटी 60 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे पाच अलिशान कार, एक कोटींची चार घड्याळेही जप्त करण्यात आली आहेत.
ईडीने तब्बल 16 तास कारवाई केली होती. यावेळी मंगलदास बांदल यांची कसून चौकशीही करण्यात आली. तसेच शिक्रापूर येथील घरी बांदल यांच्या पत्नी रेखाताई बांदल, दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली.
महंमदवाडी येथील बंगल्यात राहत असलेल्या मंगलदास बांदल यांचीदेखील ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. ईडीच्या या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना मुंबईच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Pune News | मंगलदस बांदल विधानसभेसाठी इच्छुक
शिरूर-हवेली विधानसभा लढवण्यासाठी सध्या ते इच्छुक आहे. लोकसभा निवडणुकीत मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र बांदल यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बांदल यांची उमेदवारी रद्द केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
फडणवीसांना मोठा धक्का; दोन बडे नेते शरद पवार गटाच्या मार्गावर?
मॉल, Restaurant मध्ये फोन नंबर शेअर करताय? तर ही बातमी वाचाच
“माझी पोलीस सुरक्षा काढून घ्या आणि..”; सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे मोठी मागणी
चाहत्यांना धक्का, सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या 2 महिन्यातच घेतला मोठा निर्णय
“त्या राक्षसाला शिवकाळातील चौरंगाची शिक्षा..”; बदलापूर प्रकरणी रितेश देशमुखची मागणी