मोठी बातमी ! राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसैनिकांची गर्दी, पोलिसांचा ताफा वाढवला
मुंबई | राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण जोरदार पेटलं आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर तर आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुराच रंगला आहे. अशातच राज ठाकरेंवर सभेतील चिथावणीखोर वक्तव्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आहे.
राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार पाहता मुंबईतील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा ताफा वाढवण्यात आला आहे.
राज ठाकरेंना समर्थन देण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करत आहे. त्यामुळे राज्यातील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेत अटी आणि शर्तींचं उल्लंघन झालंय का, हे तपासण्यासाठी पोलीस उपायुक्त अपर्णा गितेंनी सायबर शाखेत तब्बल 5 वेळा काळजीपूर्वक हे भाषण ऐकलं. तसंच त्यांनी गृह खात्याला अहवाल पाठवून दिला आणि कारवाई करण्यात आली, असं समोर येत आहे.
थोडक्यात बातम्या –
“राज्याच्या बाहेरुन काही गुंड आणून मुंबईत गडबड करण्याचा डाव”
चिडलेल्या न्यूज अॅंकरनं अभिनेत्याला काढलं स्टूडिओतून बाहेर, पाहा ‘तो’ व्हिडीओ
अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर सोन्याच्या दरात घसरण, वाचा ताजे दर
पबमध्ये मैत्रिणीसोबत दिसले राहुल गांधी, भाजप नेत्याकडून व्हिडीओ शेअर
“घरात बसून बोलायला काय जातं, गुन्हे तर कार्यकर्त्यांवर दाखल होतील”
Comments are closed.