बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट समोर लागली मोठी आग

पुणे | पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या सिरम संस्थेच्या समोरील आकाशवाणीला मोठी आग लाागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिरम संस्थेसमोर असलेल्या सोलापूर रोडवरील आकाशवाणीची मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत ही आग लागली आहे. गवताला आग लागल्यामुळे आगीने रौद्ररुपधारण केलं आहे.

स्थानिकांना तातडीने घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, आग मोकळ्या जागेत लागली आहे आणि वारा जास्त असल्यामुळे आग पसरत चालली आहे. अग्निशमन दलाचे जवान योग्य ती खबरदारी घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली यामागचं कारण अद्याप कळू शकलं नाही. मात्र, आग विझवण्याचं काम सुरू आहे.

थोडक्यात बातम्या

“देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हातात द्या”

“पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि गंगे’ ऐवजी ‘शवामी गंगे’”

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

राजस्थानमधील अनोखा विवाह! बलात्काराच्या आरोपीने पीडितेशी पोलीस ठाण्यातच बांधली लगीनगाठ

‘माझी विकेट फक्त…’; या मराठी अभिनेत्रीच्या फोटोवर केलेल्या ‘खास’ कमेंटमुळे ऋतुराज गायकवाड चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More