बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! अजित पवारांच्या नावाने धमकीचा फोन, मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

पुणे | पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने पुण्यातील एका मोठ्या बिल्डरला धमकीचा फोन आला आहे. या घटनेनं सगळकीकडेच खळबळ माजवली आहे.

अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा वापर करत धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या क्रमांकावरुन फोन करत आरोपींनी एका मोठ्या बिल्डरकडून 20 लाखांची खंडणी मागितली आहे. याप्रकरणी त्या बिल्डरने तात्काळ बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय असं म्हणत आरोपींनी बिल्डकला खंडणी मागितली. गुगल प्ले स्टोरवरुन ‘फेक कॉल अ‍ॅप’ नावाचं अॅप डाऊनलोड केलं. या अॅपचा वापर करत त्यांनी हा फेक काॅल केला.

दरम्यान, गेल्या दहा दिवसांपासून हा प्रकार सुरु आहे. आरोपींनी आत्तापर्यंत बिल्डरकडून 2 लाख रुपये उकळले आहेत. वारंवार येणाऱ्या धमकीला कंटाळून अखेर बिल्डरनं बंडगार्डवन पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

Makar sankranti 2022: ओमिक्राॅनविरोधात रोगप्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी तिळाचे लाडू सेवन करा

Omicron पासून बचाव करण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

कोरोना झालेल्या मुलासोबत महिलेनं केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

मोठी बातमी! अखेर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर

Omicron चं ‘हे’ नवीन लक्षण आलं समोर, दिसल्यास तात्काळ डाॅक्टरकडे जा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More