बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला अटक, कारण ऐकून हैराण व्हाल

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. अश्लील चित्रपट तयार केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात राज कुंद्रा हे मुख्य सूत्रधार असल्याचा पुरावा मिळाल्यानं त्यांना अटक करण्यात आल्याचं कळतंय.

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे अश्लील चित्रपट रेकॉर्ड करणे आणि ते प्रसिद्ध केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी जवळपास 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर काल संध्याकाळी कुंद्रा यांना अटक करण्यात आली, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आपल्याकडे अधिक पुरावे असल्याचं सांगत राज कुंद्रा यांना अटक केली.

अश्लील चित्रपटांची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. याच प्रकरणात आता राज कुंद्रा यांचं नाव समोर येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून अनेकांची चौकशी करण्यात आली होती. राज कुंद्राला आज 20 जुलैला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. राज कुंद्रा यांना अटक झाल्यामुळे सध्या बॉलिवूड आणि उद्योग जगतामध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“दरवर्षी मुंबई तुंबते…तीन पिढ्यांपासून बीएमसी चालवणारं ठाकरे कुटुंब फेल”

“माझ्यानंतर सलमानच्या किती गर्लफ्रेंड होत्या माहित नाही, मी त्याच्या संपर्कात नाही”

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आज नव्या बाधितांची संख्या आली 400 वर

“भाजपचा ‘हा’ नेता बोलायला उभा राहिला तर मुख्यमंत्र्यांना बोलताना विचार करावा लागतो”

दिलासादायक! महाराष्ट्रात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More