बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खूशखबर! ऐन सणासुदीच्या तोंडावर तेल स्वस्त होणार?

मुंबई | अचानक वाढवण्यात आलेेले जीएसटी (GST), महागाई यामुळे सर्वसामान्याचं जगणं अवघड झाल आहे. मात्र, आता सर्वसामांन्यांसाठी एक दिलासादायक बातमी असून ही दिवाळी चिंतामुक्त होण्याची शक्यता आहे.

या ऑगस्ट महिन्यात पामतेलाच्या (palm oil) आयातीमध्ये 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  10 टन तेल आपल्या देशात सप्टेंबर महिन्यात आयात होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या महिन्यात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

जुलै महिन्याच्या तुलनेत देशात 87 टक्के जास्त तेल आयात (import) करण्यात आलं आहे. मागील 11 महिन्यातील सर्वाधिक तेल आयात ऑगस्ट महिन्यात करण्यात आली. आंतराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या किंमती 40 टक्क्यांनी घसरल्या आहेत. पामतेलाची किंमत 1000-1100 डाॅलर टन वर घसरली आहे.

पामतेल खाद्यतेलापेक्षा स्वस्त झालं आहे. ते अधिक प्रमाणात आयात केलं गेलं आहे. सणवार सुरु झाल्याने पामतेलाची मागणी वाढू शकते. येत्या आगामी काळात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसेच सुर्यफुल आणि सोयाबीन तेल पुढील वर्षासाठी करमुक्त (tax free) करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या

Relationship: नवीन नात्यात चूकुनही करु नका ‘या’ गोष्टी, येईल कायमचा दुरावा

जेनिफर विंगेटवरच्या प्रेमाची कबुली देत अभिनेत्याने व्यक्त केली ‘ही’ ईच्छा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More