बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! अमित शहा आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट होणार

नवी दिल्ली | सध्या दिल्लीत लोकसभेचं पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. त्यामुळे सर्व खासदार आणि प्रमुख नेते दिल्लीत आहेत. नेत्यांच्या भेटीगाठीमुळे आता दिल्लीचं वातावरण तापलेलं दिसतंय. काही दिवसांपुर्वी 14 पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित बैठक घेतल्यानं चर्चेला उधाण आलं होतं. तर, सोमवारी संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यातच आता राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट होणार आहे. नुकतंच सरकारने सहकार खातं चालू केलं आहे. अमित शहा हे देशाचे पहिले आणि नवे सहकारमंत्री आहेत. शरद पवारांचा या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून दबदबा होता. आता नवं खातं सुरू करण्यात आल्यानं या क्षेत्राशी निगडीत काही समस्या आणि विषयांवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं समोर येत आहे.

दुपारी 2 वाजता शरद पवार अमित शहा यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांनी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी राष्ट्रहिताच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं.

दरम्यान, देशात कृषी, साखर कारखाने, डेअरी, मत्स्य अशा एकूण 55 सहकारी संस्था आहेत. या 55 संस्थांवर सध्या राज्याचं वर्चस्व आहे. येत्या काळात सहकारी तत्वावर शेती व्यवसाय होणार असल्यानं त्याचा फायदा केंद्राला तसेच राज्याला देखील होणार आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळू शकते.

थोडक्यात बातम्या-

सर्वत्र उत्तर प्रदेशचाच बोलबाला, देशातील 24 बोगस विद्यापीठांपैकी 8 विद्यापीठे उत्तर प्रदेशची

‘जोधा अकबर’मधील ‘या’ अभिनेत्याचा जीव वाचवण्यासाठी कापावा लागला पाय

चेहऱ्यावरच्या तेलकटपणासाठी ‘हा’ फेसपॅक अत्यंत गुणकारी

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; अशोक चव्हाणांनी दिली महत्वाची माहिती

आज सह्याद्रीवर बैठक पार पडणार, ठाकरे सरकार घेणार महत्वाचे निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More