बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात दाखल

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अनिल देशमुख यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात(J.J. Hospital) दाखल करण्यात आलं आहे.

अनिल देशमुख यांना शनिवारी खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 1 एप्रिल रोजी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते. खंडणी आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली त्यांना ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना अटक केली होती.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) 100 कोटींच्या वसूली प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत सापडले. अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

दरम्यान, अनिल देशमुख प्रकरणी आता चौकशी सीबीआयकडे (CBI) सोपवण्या आली आहे. सीबीआयने ताबा घेतल्यानंतर देशमुख, वाझे आणि पालांडे यांना चौकशीसाठी दिल्लीला नेले जाणार होतं. मात्र त्यापूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण, पाहा आजचे दर

मोठी बातमी! नवाब मलिकांना मोठा झटका, तुरुंगातील मुक्काम वाढला

Sujay Vikhe: “… तर मग आम्ही एका मिनिटात पलटी मारू”

कडक उन्हात तहानलेल्या माकडासाठी पोलीस कर्मचारी ठरला देवदूत, पाहा व्हिडीओ

सरकारची भन्नाट योजना! फक्त 250 रूपये भरून सुरक्षित करा मुलीचं भविष्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More