मोठी बातमी! चिंचवड पोटनिवडणुकीत आणखी एक मोठा ट्विस्ट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चिंचवड आणि कसबा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यातली त्यात चिंचवडच्या पोटनिवडणुकीबाबत सातत्याने नवीन काहीतरी राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळं चिंचवड पोटनिवडणुकीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चिंचवडमध्ये महाविकास आघाडीनं राष्ट्रवादीच्या नाना काटे(Nana Kate) यांना अधिकृत उमेदवार जाहीर केलं आहे. परंतु ठाकरे गटाच्या राहुल कलाटे(Rahul Kalate) यांनी ठाकरेंच्या विरोधात निर्णय घेत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.

आता हे सगळं घडलं असतानाच वंचित बहुजन आघाडीनं चक्क राहुल कलाटे यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. एकीकडं ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीनं युती जाहीर केली आहे तर आता ठाकरेंचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला पाठिंबा न देता वंचित बहुजन आघाडीनं कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांणा उधाण आलं आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी अधिकृत पत्र जाहीर करत कलाटेंना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टीकरण देताना असंही म्हटलं आहे की, चिंचवडमध्ये भाजपला कलाटेच थांबवू शकतात. त्यामुळं वंचित बहुजन आघीडीच्या कार्यकारिणीनं एकमतानं राहुल कलाटे यांना पाठींबा जाहीर केला आहे.

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीबाबत सोनिया गांधी यांचं कोणतंही विनंतीपत्र आलेलं नाही. त्यामुळं कसबा पोटनिवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असंही वंचित बहुजन आघाडीकडून सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-