मुंबई | राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना शिवसेनेला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. काल पर्यंत शिवसेनेसोबत असणारे आमदार संतोष बांगर हे आज शिंदे गटात दाखल झाले आहेत.
शिवसेनेचा आणखी एक आमदार फुटल्याने शिवसेनेला आणखी एक झटका बसला आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. बहुमत चाचणीपूर्वी शिवसेनेसमोर आता एक मोठी अडचण आली आहे.
आमदार बांगर देखील शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या ताज्या घडामोडीनंतर शिंदे गटातील आमदारांची संख्या आता 40 वर गेली आहे.
दरम्यान, काल विधानसभा अध्यक्षनिवडनुकीवेळी संतोष बांगर यांनी नार्वेकराच्या विरोधात मत दिलं होतं. काही दिवसापूर्वी संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काढलेल्या आक्रोश मोर्चेत ते सहभागी होते. मात्र, संतोष बांगर यांनी अचानक घेतलेल्या यूटर्न मुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
थोडक्यात बातम्या
‘घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच असे दुटप्पीपणे वागत असतील तर…’, शिवसेनेचा घणाघात
मोठी बातमी! शिवसेनेला आणखी एक धक्का, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदेच
शरद पवारांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून गिरीश महाजन अजूनही फेट्याने डोळे पुसतायेत”
Comments are closed.