बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शिवसेनेला आणखी एक धक्का, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदेच

मुंबई | शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेला धक्का देत विधानमंडळाने मोठा निर्णय दिला आहे. एकनाथ शिंदेच शिवसेनेच्या गटनेतेपदी असतील तर भरत गोगावले हेच प्रतोद असतील असा निर्णय विधानमंडळाने जाहीर केला आहे.

शिवसेनेचे सुनिल प्रभू यांची नेमणूक रद्द करण्यात आली आहे. काल विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यावेळी व्हिप मोडत मतदान केल्याने 16 आमदारांच्या डोक्यावर निलंबनाटची टांगती तलवार आहे.

सध्याच्या राजकीय घडामोडी आणि कायदेशील पेच यामुळे उद्धव ठाकरे आणि इतर आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर अजूनतरी एकनाथ शिंदे गटाकडून अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

दरम्यान, अरविंद सावंत यासंबधी बोलताना म्हणाले, “मागच्यावेळी एकनाथ शिंदे यांचं असच प्रकरण कोर्टात गेलं होतं. त्यावेळी कोर्टाने त्यांच्याबाजूने निकाल दिला होता. सध्या संविधानाची टिंगल उडवली जात आहे. गटनेता निवडण्याचा अधिकार गटाच्या प्रमुखाचा असतो त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे. आम्ही या निर्णयाना आव्हान देणार आहोत”

थोडक्यात बातम्या

“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून गिरीश महाजन अजूनही फेट्याने डोळे पुसतायेत”

‘केसरकर काय चांगले प्रवक्ते झाले, आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही’; सभागृहात अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

‘अडीच वर्षे ऐकलं नाही आतातरी…’; जयंत पाटलांचा राज्यपालांना खोचक टोला

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच; खासदार विनायक राऊतांनी केला खुलासा

“कसाबच्या वेळीसुद्धा एवढी सुरक्षा नव्हती, इतकी भीती कशाची”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More