बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! युक्रेनमधून निघालेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली

कीव | रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस भयावह रूप घेताना दिसत आहे. रशियाकडून होत असलेले बॉम्ब हल्ले, मिसाईल हल्ले, गोळीबार यामुळे युक्रेन हादरलं आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह खार्कीवमध्ये हल्ले अधिक तीव्र केले आहेत. त्यात हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

रशियाने खार्कीव येथे केलेल्या मिसाईल हल्ल्यात कर्नाटकातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली आहे. हा विद्यार्थी या गोळीबारात जखमी झाला असल्याची माहिती नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही के सिंग यांनी दिली आहे.

गोळी लागलेला हा विद्यार्थी युक्रेनमधुन मायदेशी परत येण्यासाठी निघाला होता. त्याला गोळी लागल्यानंतर उपचारासाठी अर्ध्या वाटेतून परत नेण्यात आलं. संबंधित विद्यार्थी गोळीबारात जखमी झाल्याचं सिंग यांनी सांगितलं. आणखी एका विद्यार्थ्याला गोळी लागल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.

दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी आतोनात प्रयत्न सुरू आहेत. कमीत कमी नुकसानासह जास्तीत जास्त नागरिकांचं स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही व्ही के सिंग यांनी सांगितलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

Audi कंपनीचा ग्राहकांना झटका, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

रशिया-युक्रेन युद्धामुळे भारत-अमेरिकेत वादाची ठिणगी?, महत्त्वाची माहिती समोर

रशियाने भारतासाठी सहा तास युद्ध थांबवलं?, परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

कोरोना कायमचा संपला नाही, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

भाजपवर टीका करत एकनाथ खडसेंचा महाविकास आघाडीला घरचा आहेर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More