बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! ड्रग्स प्रकरणात पहिला जामीन मंजूर; आर्यन खानला सुट्टी नाहीच

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून कथित क्रूझ ड्रग्स प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह त्याच्या अन्य साथीदारांना एनसीबीने अटक केली होती. या सर्वाची मागील काही दिवसांपासून मुंबईच्या ऑर्थर रोड तुरूंगात मुक्काम सुरू आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरूख खान मोठे प्रयत्न करताना दिसत आहे.

मंगवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. मंगळवारी क्रूझ ड्रग्स प्रकरणाची सुनावणी संपली आहे. आता या पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. त्यामुळं आर्यन खानची आजची रात्र देखील तुरूंगातच असणार आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये मनिष राजेगरियाला जामीन मंजूर झाला आहे.

आर्यन खानकडे कसल्याही प्रकारचे ड्रग्स सापडले नाहीत आणि तसेच त्याने कोणतेही ड्रग्स घेतल्याचे पुरावे नाहीत. एनसीबीने आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आर्यनला पकडले आहे. तसेच त्याची कोणतीही वैद्यकीय चाचणी केलेली नाही. अरबाजच्या शुजमध्ये ड्रग्स सापडले, असा युक्तीवाद आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी होणार आहे. आर्यन खानच्या जामिनासाठी एनसीबीने विरोध केला आहे. आता जर जामीन मिळाला तर याचा थेट परिणाम पुढील तपासावर होईल असा दावा एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये केला आहे. तसेच आर्यन खानला उद्या जामीन होतो का? याकडे सर्वाचे लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

बँकेची कामं आटोपून घ्या! पुढील महिन्यात बँका 17 दिवस बंद

“त्यांच्या सांगण्यावरून मलिक आरोप करतायेत, पुरावे असतील तर न्यायालयात जा”

“बिडीची जेवढी किंमत महाराष्ट्रात आहे तेवढी सुद्धा ईडीची राहिली नाही”

दिवाळीपूर्वी खवय्यांसाठी खूशखबर! ‘या’ गोष्टींच्या किंमतीत मोठी घट

निवडणुकीआधी भाजपची मोठी रणनिती! तब्बल 100 आमदारांचं तिकीट कापण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More