बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना मोठा झटका

मुंबई | भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे चांगलेच अडकले असून हा तिढा वाढतच चालल्याचं पहायला मिळत आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयानं आज नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

येत्या 10 दिवसांत नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायलयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत निेतेश राणे यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.

नितेश राणे हे 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर हजर होऊन नियमित जामीन अर्ज दाखल करु शकणार आहेत. मात्र, अटकपूर्व जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद झाला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे का होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे सध्या अडचणींत आहे. याप्रकरणी त्यांच्यावर आरोप करण्यात आल्यापासून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

“‘टिपू सुलतान’ नामकरणावरून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे”

‘आम्हाला इतिहास कळतो, तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाही’; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार डाॅ. अनिल अवचट यांचं निधन

“लोकांना येडं बनवण्याचं काम चालूये”, चंद्रकांत पाटलांची अजित पवारांवर खोचक टीका

मुंबईत मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली, बचावकार्य सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More