मोठी बातमी! शिंदे सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मुंबई | जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अवकाळी पावसात(Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी नुकसान झालेल्या भागांत दौरे करत पाहणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही(Eknath Shinde) शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असं सांगितलं होतं.
यातच शेतकऱ्यांना आणखी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. नुकसान भरपाईचे रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय महसूल आणि वन विभागानं जाहीर केला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे.
यानुसार जिरायती पिकांसाठी प्रती हेक्टर 13 हजार 800 रूपये देणार आहेत. यापूर्वी प्रती हेक्टरसाठी 6 हजार 800 रूपये देण्यात येणार होते. तर बागायती पिकांची नुकसान भरपाई म्हणून 27 हजार प्रती हेक्टर देण्यात येणार आहेत.
बहुवार्षिक पिकांची नुकसान भरपाई 36 हजार रूपये प्रती हेक्टर मिळणार आहे. यापूर्वी 18 हजार रूपये प्रती हेक्टर देण्यात येणार होते. या रकमेत दुपटीनं वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आनंद होणार आहे.
दरम्यान, यापूर्वी राज्यात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी पाच हजार चारशे एकोणचाळीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.