बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! भाजप आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचार प्रमुख शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (santosh parab) हल्याप्रकरणी आमदार नितेश राणेंवर (Nitesh Rane) आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी नितेश राणेंवर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ पहायला मिळत आहे.

नितेश राणेंना आणखी एक मोठा झटका बसला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली पहायला मिळत आहे.

संतोष परब हल्ल्याप्रकरणी, नितेश राणेंना अटक व्हावी अशी मागणी करण्यात आली असून, तशी पोलिसांत तक्रार देखील दाखल केली गेली आहे. अशातच आता न्यायालयाने संशयित आरोपीना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. यातच आता अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

दरम्यान, दोन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर आज जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी अटकपूर्व जामीन नाकारला.

थोडक्यात बातम्या – 

‘…त्यांनी काँग्रेस नेते राहूल गांधींचा पपलू केलाय’; किरीट सोमय्यांचा घणाघात

‘पुष्पा I Hate Beer’; पोलिसांची ‘ती’ पोस्ट तुफान व्हायरल

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

“…तर मला वाटतं मी माझा वेळ वाया घालवत आहे”, ‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

राणे सगळ्यांना पुरुन उरणारे आहेत – चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More