बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! नागपुरात निर्माणाधीन पुल कोसळला; अख्ख कुटूंब थोडक्यात बचावलं!

नागपूर | नागपुरमधील एक निर्माणाधीन पुल कोसळल्याची दुर्घटना काल रात्री घडली आहे. दरम्यान, रात्री 9 च्या सुमारास काम सुरू असताना पुलाचा काही भाग पुर्णपणे कोसळल्याने एकच खळबळ उडाली. तसेच नागपूरमध्ये सध्या या पुलाचीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कळमना मार्केटकडे जाणाऱ्या भारतनगर चौकात ही दुर्घटना घडली.

पुल पडण्याच्या वेळी अवघ्या सेकंदाच्या फरकाने तेथून एक कार पुर्ण कुटूंबासह गेल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे हे कुटूंबीय थोडक्यात या दुर्घटनेतून बचावले असंच म्हणता येईल, त्याचबरोबर निर्माणाधीन पुल कोसळल्याने विरोधी पक्षाकडून नितीन गडकरी आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

दरम्यान ही घटना कशी घडली याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या पुलाच्या पिल्लरवर स्पॅन बेअरींग करण्यासाठी त्याला उचलण्यात येत होतं. त्यावेळी स्पॅन घसरून ही घटना घडली. पण सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याने चिंता काही प्रमाणात कमी व्यक्त केली जात आहे.

अशी गंभीर घटना नागपुरमध्ये घडल्याने आता या घटनेला नेमकं जबाबदार कोण?, असा संतप्त सवाल या माध्यमातून जनतेकडून विचारला जात आहे. ही घटना घडल्यानंतर तात्काळ आमदार कृष्णा खोपडे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच आता या प्रकरणामुळे एका बड्या अधिकाऱ्याची या प्रकल्पातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा मोठा निर्णय; राजकारणात नवं समीकरण दिसणार?

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

“कासवाला सुद्धा लाज वाटेल, अशा गतीने ठाकरे सरकार काम करतंय”

“त्यात काहीच तथ्य नाही; आर्यन खान निर्दोष, त्याला गोवलं जातंय”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More