बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत नवीन नियमावली, ‘हे’ असणार नवे नियम

मुंबई | डिसेंबर महिना संपत आला आहे. त्यामुळे लोक नवीन वर्षाच्या तयारीला लागले आहेत. येत्या 31 डिसेंबरला (31st december) लोक नवीन वर्षाचं स्वागत करतील आणि या वर्षाला अलविदा करतील. मात्र या काळात गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. याच पार्श्वभूमीवर उद्यापासून मुंबईत नवी नियमावली लागू होणार आहे.

कोरोनाचं सावट असताना ओमिक्राॅनच्या व्हेरिएंटनं (Omicron varriant) चिंता वाढवली आहे. ओमिक्राॅनचा संसर्ग वाढत असतानाच रुग्णांच्या संख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे. संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरु नये म्हणून आतापासूनच खबरदारी घेतली जाताना दिसत आहे.

मुंबईत उद्यापासून मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जारी केली आहे. मॉल, दुकानं, सार्वजनिक वाहतूक इथे केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रमात केवळ 50 टक्के उपस्थितीची अट लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, उद्यापासून सुरु होणारी नियमावली 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत जारी करण्यात आली आहे. ख्रिसमस आणि न्यू इयर (New Year) पार्ट्यांसाठी हे निर्बंध आणण्यात आलेत. पार्ट्यांना केवळ 50 टक्के उपस्थिती ठेवण्यात येईल.

थोडक्यात बातम्या – 

रुपाली ठोंबरेंच्या राजीनाम्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“मोदींनी डुबकी मारलेल्या त्याच गंगेत कोरोना काळात हजारो प्रेते वाहत होती”

लग्नानंतर विकी-कतरिना पहिल्यांदाच मिडियासमोर, विककॅटच्या लूकनं वेधलं लक्ष

अखेर अभिनेत्री अंकिता लोखंडे अडकली लग्नबंधनात, पाहा व्हिडीओ

रूपाली ठोंबरेंचा मनसेला दे धक्का; लवकरच ‘या’ नव्या पक्षात करणार प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More