बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठा आरक्षणासंदर्भात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट

मुंबई | मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर मोठ्या प्रमाणात विरोधकांनी टीकेची झोड उठवली. महाराष्ट्र सरकारविरोधात छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी देखील निदर्शने केली. दरम्यान, आता मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारचे एक शिष्टमंडळ दिल्लीला रवाना होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचे शिष्टमंडळ उद्या मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला दिल्लीला जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला आहे.

मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र सरकारचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार असून आता नेमकी यासंदर्भात महाराष्ट्र सरकार काय भूमिका मांडणार आणि त्यावर केंद्र सरकार नेमके काय पावले उचलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण सध्या तरी मराठा समाज चांगलाच पेटून उठल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभरात पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान महाराष्ट्रात वादळाने झालेले नुकसान तसेच मागासवर्गीय आरक्षण व मराठा आरक्षण अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशवासियांशी साधणार संवाद

सकारात्मक बातमी! रविवारी देशात सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

“‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या”

‘आम्हाला हनीमूनला जाण्यासाठी ई-पास हवाय!’

पुण्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या ‘या’ हॉटेलवर पोलिसांची धाड; तब्बल 41 जणांवर गुन्हा दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More