बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चित्रा वाघ यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी; 80 नेत्यांच्या यादीत मिळवलं स्थान

नवी दिल्ली | भारतीय जनता पक्ष आज देशातील सर्वात जास्त राज्यात सत्तेत असलेला पक्ष आहे. संघटनात्मक बांधणी करण्यात भाजप नेहमीच अग्रेसर राहिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 ला दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. त्यांच्या मंत्रीमंडळात तत्कालिन भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी देशाचे गृहमंत्री म्हणून शपथ घेतल्यानं जे पी नड्डा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. नड्डा यांनी आता राष्ट्रीय कार्यकारिणीचा विस्तार केला आहे. या कार्यकारिणीत राज्यातील भाजपचा आक्रमक चेहरा चित्रा वाघ यांचा समावेश करण्यात आला आहे.

भाजपच्या विद्यमान राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना थेट राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं आहे. चित्रा वाघा या आक्रमक नेत्या म्हणून प्रसिद्ध आहेत. सातत्याने ठाकरे सरकारवर टीका करण्यात त्या अग्रेसर असतात. अनेक आरोप करून चित्रा वाघ यांनी आक्रमकपणे तत्कालिन मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं होतं.

चित्रा वाघ आपल्या पुर्वाश्रमीचा पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेसवर जोरादार टीका करताना दिसून येतात. राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर देखील चित्रा वाघ यांनी वारंवार आरोप केले आहेत. भाजपाने चित्रा वाघ यांच्या आक्रमकतेचा फायदा राष्ट्रीय राजकारणात करून घेण्यासाठी त्यांना थेट राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रवेश दिला आहे.

राज्यातील काही निवडक नेत्यांचा या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाला आहे. गतवर्षी या यादीत समावेश असलेल्या विजया रहाटकर यांना या यादीत आता स्थान देण्यात आलं नाही. चित्रा वाघ यांच्या रूपाने भाजपने एक आक्रमक महिला चेहरा राष्ट्रीय राजकारणात समाविष्ट केला आहे.

थो़डक्यात बातम्या 

आयकर धाडीनंतर सोमय्या म्हणतात, पवार साहेब जरंडेश्र्वरचा खरा मालक कोण?

शालूकडून नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा, पाहा राजेश्वरी खरातचा गोजीरवाणा अंदाज

आता देवीच्या मंडपात फक्त 5 जणांनाच परवानगी, वाचा सविस्तर

कारखान्यावरील धाडीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आरोग्यमंत्र्यांनी केली नवीन योजनेची घोषणा, काय आहे ‘मिशन कवच कुंडल’?

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More